Delhi Crime Livein Partner Kills Woman Over Relationship Twist Husband Takes Shocking Step
Esakal
Crime | गुन्हा
दोघांची हत्या पण ३ जीव गेले! विवाहित प्रेयसीला संपवलं, प्रियकराची पतीने तिथंच केली हत्या ; गर्भातल्या बाळावर दोघांचा दावा
Delhi Crime News : पतीशी बिनसल्यानंतर लिव्ह इनमध्ये प्रियकरासोबत राहणारी विवाहिता पुन्हा पतीसोबत रहायला लागली. यामुळे रागाच्या भरात प्रियकराने तिची हत्या केली. यानंतर पतीने प्रियकराला संपवलं.
दिल्लीतील नबी करीम परिसरात शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली. परिसरात एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पण यात तीन जीव गेले. आशू नावाच्या तरुणानं त्याच्या विवाहित प्रेयसीची हत्या केली. त्याची प्रेयसी गर्भवती होती. या घटनेनं संतापलेल्या प्रेयसीच्या पतीनं प्रियकराला संपवलं.

