

Double Murder Case As Hut Locked From Outside And Set Ablaze
Esakal
तामिळनाडुत शुक्रवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी एका झोपडीला बाहेर कुलूप लावून आग लावल्याचा प्रकार घडलाय. या आगीत होरपळून ५३ वर्षीय शेतकरी आणि त्याच्या ४० वर्षीय लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू झालाय. तामिळनाडुतल्या चेंगर परिसरात ही घटना घडलीय. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव पी शक्तिवेल असं असून त्याच्या पार्टनरचं नाव एक अमृतम असं आहे. शक्तिवेल हा शेतकरी होता. तीन एकर शेतजमीन असलेल शक्तिवेल हा दहा बाय दहाच्या झोपडीत रहायचा.