

Crime News
esakal
जळगाव: एका तरुणीला पैशांची मदत करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिच्यावर शहरातील सागर पार्क परिसरात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही बाब कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही पीडितेला दिल्याने तिच्या तक्रारीवरून संशयित सुनील मधुकर चौधरी (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.