Kolar Tragedy: घर बांधायला १५ लाखांचं कर्ज घेतलं, वसुलीसाठी तगादा; महिलेनं दोन मुलांसह संपवलं आयुष्य

Woman and Two Children Found Dead in Kolar: कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात कर्जफेडीच्या कथित तणावाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेसह तिच्या दोन मुलांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले.
Kolar Tragedy

Kolar Tragedy

esakal

Updated on

बंगळूर: कर्जदार आणि खासगी वित्तसंस्थांच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोलार तालुक्यात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कोलार तालुक्यातील छत्रकोडिहळ्ळी परिसरातील शेततळ्यात प्रमिळा (वय ४०), मुलगी स्वप्ना (वय २२) आणि मुलगा चरण (वय १८) यांचे मृतदेह आढळून आले. तिघेही बेग्लिबेणजेणहळ्ळी गावातील रहिवासी होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com