

Nagpur Extortion Case
esakal
नागपूर: अंगणवाडीचा पोषण आहार असलेले मालवाहू वाहन सोडण्यासाठी दोन लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. नकार देताच दोन आरोपींनी तरुणाला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तोतया पोलिसासह साप्ताहिकाच्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.