Paithan: धक्कादायक ! नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी शेतात नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना तेलवाडी (ता. पैठण) येथे शनिवारी घडली.
Paithan: धक्कादायक ! नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार,  अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल
Updated on

Paithan 13 Year Old Minor Physically Assaulted: इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी शेतात नेऊन बलात्कार केल्याची खळबळजनक घटना तेलवाडी (ता. पैठण) येथे शनिवारी (ता. दोन) घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, दोही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संजय मच्छिंद्र मोहिते (वय २७), विलास विनायक मुळे (वय २३) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, तेलवाडी येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनी मुलीवर दिवाळी सणापुर्वी आरोपी संजय मोहिते याने तू मला खूप आवडते असे बोलून मळ्यात नेऊन बलात्कार केला होता.

यानंतर दुसरा आरोपी विलास मुळे तरुणाने मुलीची आई व भाऊ पैठणला गेल्याचे पाहून तिच्या घरी गेला व मित्र मोहिते याच्या मळ्यातून मोसंबी आणायच्या असल्याचे सांगून नेले व तेथील झोपडीत बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित मुलीने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून बलात्कार व विविध कलमांसह अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे हे करीत आहेत. (Latest Marathi News)

Paithan: धक्कादायक ! नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार,  अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल
Maratha Reservation: 'मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही,ज्यांच्या नोंदी...'; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Newlywed wife missing with minor brother in law
crime
Minor Harassment Allegations: POCSO Case Filed Against Doctor's Son-in-Law in Solapur
Kalyan Crime
Marathi News Esakal
www.esakal.com