

Palghar Attack Case
esakal
पालघर: पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात 12 जून रोजी संध्याकाळी स्नेहल सावंत तरुणीवर तिच्या प्रियकराने कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर स्नेहल हिच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. अखेर आज तिची मृत्यूशी झुंज संपली असून उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.