

Yavatmal News
esakal
घाटंजी: अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पारवा पोलिसांनी तालुक्यात केलेल्या कारवायांवरून सध्या विविध चर्चांना उधाण आले आहे. कारवाईची पद्धत, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे समान प्रमाण आणि एफआयआरमधील एकसारखा मजकूर यामुळे या मोहिमेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.