गुन्‍ह्यांमध्ये कुंपणच खातंय शेत!

अनेक गुन्ह्यांमध्ये संबंधित ठिकाणी काम करणाराच व्यक्ती गुन्हा करीत असून तोच आरोपी ठरत आहे.
crime
crimesakal

पिंपरी : एखादा गुन्हा घडल्यास त्यातील आरोपी त्रयस्थ अथवा अज्ञात असतो. मात्र, आता अनेक गुन्ह्यांमध्ये संबंधित ठिकाणी काम करणाराच व्यक्ती गुन्हा करीत असून तोच आरोपी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बँक, औद्योगिक, वैद्यकीय क्षेत्रही मागे नाही. अशा घटनांमधून कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट होते. (working people crime being accused)

पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलिस ठाण्यात दररोज वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत असते. चोरी, लूटमार, फसवणूक आदी गुन्ह्यातील आरोपी त्रयस्थ अथवा अज्ञात असतात. मात्र, काही दिवसांपासून अशा गुन्ह्यांमध्ये संबंधित यंत्रणेत काम करणारे अधिकारी, कर्मचारीच आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे. भोसरीतील एटीएम मशिनमधून रोकड चोरीप्रकरणात बँकेच्याच रोखपाल व शिपायाचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या दोघांनी चक्क तडीपार गुन्हेगारासह आणखी एकाला चोरीतील काही पैसे देण्याच्या बोलीवर या कामासाठी नेमले. दरम्यान, या घटनेव्यतिरिक्त इतरही काही बँकेतील रकमेच्या अपहारप्रकरणी बँकेच्याच संचालकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

दोन महिनांपूर्वी म्हाळुंगे येथील एका कंपनीतून माजी कामगाराने कंपनीच्या दरवाजाची काच फोडून तब्बल तीस लाख रुपये किमतीचे मशिन चोरले. यातील आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी अटक ही केली. अशाचप्रकारच्या इतरही अनेक घटना औद्योगिक परिसरात घडल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातही असाच उद्योग सुरू आहे. कोरोना काळात रुग्णांना वेळेत उपचार व औषधे मिळण्यासाठी नातेवाईक धावपळ करीत असताना काही डॉक्टर, नर्स व मेडिकल चालकांनी त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला. औषधांचा मोठ्याप्रमाणात काळाबाजार केला.

crime
पैलवान झाला बिझनेसमन; 'हेल्दी' व्यवसायाची अनोखी कहाणी

वैद्यकीय क्षेत्रातील काही घटना

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर कोविड रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी चार डॉक्टरांवर कारवाई झाली. तसेच येथील रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन गैरमार्गाने मिळवून त्याची काळ्याबाजारात विक्री विकणाऱ्या येथील एका पुरुष परिचारकावरही गुन्हा दाखल झाला. यासह दुसऱ्या एका प्रकरणात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका डॉक्टरसह हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफमधील कर्मचारी, डिलिव्हरी बॉय व मेडिकल चालकाचा समावेश होता. गुंडा विरोधी पथकाने म्यूकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी एका परिचारिकेसह पाच जणांवर कारवाई केली.

संशय वाटल्यास पोलिसांना कळवा

कामगार कामावर ठेवताना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासह पूर्व इतिहास पाहणेही आवश्यक आहे. एखाद्या कामगाराबाबत संशय वाटल्यास तातडीने पोलिसांना कळविणे गरजेचे आहे. गोपनीय माहिती अधिक गोपनीय कशी राहील, यासाठी सतर्कता महत्त्वाची आहे.

सुरक्षाव्यवस्थाही ठरते कुचकामी

चोरी अथवा कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सीमाभिंत उभारण्यासह सुरक्षारक्षक नेमणे व सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. अशा उपाययोजना राबवल्या, तरी संबंधित यंत्रणेतील व्यक्तीच एखाद्या घटनेत सहभागी असल्यास त्यांच्यापुढे सुरक्षाव्यवस्थाही कुचकामी ठरते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com