16 Somvar Vrat: श्रावण हा महिन्याला देवाधिदेव महादेवाचा अत्यंत पूजनीय आणि शुभ काळ मानला जातो. यंदा श्रावण महिन्याची सुरुवात २५ जुलैपासून झाली असून, पहिला सोमवार २८ जुलैला आहे. या काळात निसर्ग हिरवागार होतो आणि वातावरण भक्तिभावाने भारावलेलं असतं. दर सोमवारी मंदिरांतून “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा उच्चार होत राहतो, ज्यामुळे संपूर्ण माहौल आध्यात्मिकतेने झळकत असतो.