असाही योगायोग: आज सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या एकाच दिवशी

यंदाच्या वर्षातलं पहिलं आणि एकमेव 'खग्रास' सूर्यग्रहण 4 डिसेंबरला होणार आहे.
Solar Eclipse 2021 and Shani Amavasya
Solar Eclipse 2021 and Shani AmavasyaESAKAL

सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या (Solar Eclipse 2021 and Shani Amavasya):

4 डिसेंबर म्हणजेच आजचा दिवस धार्मिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही प्रकारचे दृष्टीकोन ठेवणाऱ्यांसाठी एक विलक्षण योगायोग आहे. खग्रास सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या आज एकत्र होत आहेत.

सूर्यग्रहणाची वेळ काय असेल ?

पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यावर सूर्यग्रहण पाहायला मिळतं. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात तेव्हा ‘खग्रास सूर्यग्रहण’ दिसून येतं.भारतीय प्रमाणवेळेनुसार यंदाचं हे पूर्ण सूर्यग्रहण ४ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल आणि दुपारी १.३० वाजता पूर्ण सूर्यग्रहण दिसू शकेल.

Solar Eclipse 2021 and Shani Amavasya
सुर्यग्रहण काऴात कोकणात अनेक घरांसमोर 'हे' ठेवण्याची आहे परंपरा....

सूर्यग्रहण भारतातून दिसणार का?

नासाने दिलेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण पूर्ण अंटार्टिका खंडावर पाहता येणं शक्य असेल. याशिवाय सेंट हेलेना, साऊथ जॉर्जिया, फॉकलंड बेटे, चिली, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणाहूनही आंशिक सूर्यग्रहण पाहता येऊ शकेल. भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही.

भारतात हे सूर्यग्रहण पाहायला मिळणार नसलं तरी अंटार्टिकाच्या 'युनियन ग्लेशियर'हून नासा (NASA) या सूर्यग्रहणाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. नासाची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हे सूर्यग्रहण पाहता येईल. भारतीय वेळेनुसार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून याचं प्रसारण सुरू होईल. यापुढील सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी पाहायला मिळेल.

Solar Eclipse 2021 and Shani Amavasya
शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, काय आहे गावाचे रहस्य

शनि अमावस्येची तारीख आणि वेळ –

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या यंदा ०३ डिसेंबर रोजी दुपारी ४.५५ पासून सुरू होऊन शनिवार, ४ डिसेंबर रोजी दुपारी १.१२ पर्यंत आहे. श्रद्धाळू लोक यादिवशी विविध प्रकारची व्रत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com