
Akshaya Tritiya 2025: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खास महत्व आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा. तर तृतीया म्हणजे तिसरा दिवस. अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याची कायम प्रगती होते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास धनप्राप्ती होऊ शकते.
यंदा अक्षय्य तृतीया ३० एप्रिल रोजी साजरी केली जाणार असून ५ दुर्मिळ राजयोग तयार होत आहे. जर अक्षय्य तृतीयेला माता लक्ष्मीचे मनोभावे पुजा केल्यास आणि आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होतात. तसेच वर्षभर धनलाभ होऊ शकते. यासाठी पुढील काही उपाय करू शकता.