

7 Running Horses Vastu Direction: Placement Rules for Home & Office
esakal
Vastu Tips for 7 Horses Frame: घर किंवा ऑफिसच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आपण अनेक शो-पीस आणि पेंटिंग्स लावतो. पण, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू फक्त सजावटीपुरत्या मर्यादित नसून घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्याचे कार्य करतात. यामध्ये 'सात पळणाऱ्या घोड्यांची फोटोफ्रेम' (7 Horses Painting) अत्यंत शुभ मानली जाते.
अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्हीही पळणाऱ्या घोड्यांची फ्रेम पाहिली असेल. ही फ्रेम प्रगती, गती आणि ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. पण, फक्त फोटो भिंतीवर लावणे पुरेसे नसते; वास्तुशास्त्रानुसार तो योग्य दिशेला आणि योग्य स्थानावर न लावल्यास प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात.