
प्रयागराज : देश-परदेशातील कोट्यवधी भाविकांच्या आगमनामुळे महाकुंभनगरीचे वातावरण अक्षरशः भारावून गेले आहे. येथील शिवनगरीमध्ये तब्बल ७ कोटी ५१ लाख रुद्राक्षांचा वापर करून तयार केलेली १२ शिवलिंग लक्षवेधी ठरली आहेत. कुंभनगरीतील ‘सेक्टर-६’ मध्ये त्यांची प्रतिष्ठापणा केली आहे.