
नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यामुळे देशातील आणि जगभरातील नागरिकांचा ओढा प्रयागराजकडे होत असताना विमान कंपन्यांकडून लूटमार सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येत असून भाविकांना विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात दुसरीकडे प्रयागराज किंवा लखनौ, वाराणसीला येणाऱ्या विमानांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.