

Akshaya Tritiya and Mythological Stories
sakal
Akshaya Tritiya Mythological Story : दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकंचा नाही तर अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. तसेच, सोने-चांदीची खरेदी आणि दान करण्याचे कार्य देखील अत्यंत शुभ मानले जाते. हे तर आपल्याला माहितच आहे, पण याव्यतिरिक्त अक्षय तृतीया साजरी करण्यामागे काही पौराणिक कथा देखील दडल्या आहेत.