
Akshay Tritiya Do's And Don'ts : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ सण मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी लक्ष्मी, भगवान विष्णू, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. तसेच, सोने-चांदीची खरेदी आणि दान करण्याचे कार्य देखील अत्यंत शुभ मानले जाते.