

Aquarius weekly horoscope 5 to 11 April 2026
esakal
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा अत्यंत सकारात्मक आणि उत्साही ठरणार आहे. आठवड्याची सुरुवातच शुभग्रहांच्या प्रभावातून होत असल्याने वातावरण प्रसन्न राहील. रविवारी मिळणाऱ्या सुवार्ता आणि प्रिय व्यक्तींचे संवाद मनाला आनंद देतील. दिवसाचा शेवटही आनंददायी क्षणांनी भरलेला असेल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष आनंदाचा ठरेल. वैयक्तिक आयुष्यात हृद्य समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम आणि आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. तुमच्या सामाजिक वर्तुळातही सकारात्मकता वाढेल.