Ashadhi Ekadashi 2022 प्रतिपंढरी जमला वैष्णवांचा मेळा; विठ्ठलवाड़ीत दुमदुमणार हरी नामाचा गजर

आषाढी एकादशी म्हटले की, विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांनाच लागते या दिवशी विठुरायाचे दर्शन घ्यावे ही आस प्रत्येकालाच असते.
Ashadhi Ekadashi 2022 Prati Pandharpur Vitthal mandir sinhagad road vitthalwadi
Ashadhi Ekadashi 2022 Prati Pandharpur Vitthal mandir sinhagad road vitthalwadi sakal

विठ्ठलवाडी : प्रतिपंढरपूर सिंहगड रस्त्याची (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) ओळख, सिंहगड रोड रस्त्याचे वैभव, आणि सिंहगड रस्त्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे विठ्ठलवाडी येथील विठ्ठलाचे मंदिर.  मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशी म्हटले की, विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांनाच लागते या दिवशी विठुरायाचे दर्शन घ्यावे ही आस प्रत्येकालाच असते.

पण, प्रत्येक वेळी प्रत्येकाला पंढरपुरला वारीत जाणे शक्य होत नाही. अशा वेळी सिंहगड रस्ता परिसरातील प्रति पंढरपूर येथे जाऊन विठुरायाच्या दर्शनाची तहान भाविक भागवितात.विठू माऊली तू .... माऊली जगाची..... माऊलीत मूर्ती विठ्ठलाची..... विठ्ठलाSSS... मायबापाSSS.... असे म्हणत विठ्ठल रखुमाई च्या दर्शनाला पहाटेपासूनच रांगा लागतात. विठ्ठल वाडी येथे सिंहगड रस्ता परिसरातील भाविक येतात यासोबतच आजूबाजूची गोर्‍हे, खडकवासला, डोणजे, खानापूर, पानशेत, पुरंदर, मुळशी, हवेली, वेल्हे या गावांसह संपूर्ण पुणे शहरातून आणि शहराजवळील इतर गावातून भाविक दर्शनासाठी येतात.

प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल वाडी येथील विठ्ठल रुक्माई चे देऊळ म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. पंढरपूरला जाता आले नाही म्हणून येथे येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात. विठ्ठलवाडी एक सहलीचे ठिकाण होते आणि असा उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी आढळतो. निवांत, निसर्गाच्या सान्निध्यात मोठ-मोठ्या वृक्षांच्या छायेत हा परिसर मनाला शांतता देतो. पावसाळा, हिरवाई बाजूलाच वाहणारी नदी या नदीत असलेले पुंडलिकाचे मंदिर वडाची आणि इतर मोठे-मोठे झाडे सायंकाळी पक्षांचा आवाज अशा निसर्गरम्य वातावरणात मन आनंदी होते.

या मंदिराची उभारणी पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाली. दोन ते तीन टप्प्यात मंदिराची उभारणी करण्यात आली. सुरुवातीस केवळ आत्ताचा प्रमुख गाभारा आहे; एवढे मंदिर होते. त्यानंतर ते हळूहळू वाढवण्यात आले.संभाजी गोसावी विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते पंढरपूरला जात होते. मात्र, एके वर्षी त्यांना जाणे शक्य झाले नाही, त्यावेळी पांडुरंग त्यांच्या भेटीला आला. त्यानंतर पांडुरंगाची मूर्ती येथे उभारण्यात आली.

सोबतच रखुमाईची मूर्ती देखील स्थापित करण्यात आले. मंदिराचे कामकाज विठ्ठल रखुमाई देव ट्रस्ट यांच्याकडे आहे. माजी आमदार कुमार गोसावी हे त्याचे अध्यक्ष आहेत. आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला नयनरम्य आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे. मंदिराचे पुरातत्व जपले जावे म्हणून विशिष्ट काम देखील करण्यात आले आहे. तसेच येथे असलेला गरुड खांब चांदीचा करण्यात आला आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला भजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भजन-कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम येथे होतात.

आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजता महापूजेस सुरुवात होते. सुमारे साडेचार वाजता महाआरती करण्यात येते. त्यानंतर पाच वाजता दर्शनासाठी मंदिर सर्वांना खुले केले जाते. या मंदिरात विठ्ठल रखुमाई सोबतच शंकर, गणपती, मारुती दासमारुती, शनि, दत्त, गरुड, दशावतार अशी मंदिरे आहेत. मंदिराची सुंदर रचना आहे. विठ्ठलवाडीत एकादशीनिमित्त यात्रा भरवली जाते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात विविध स्टॉल्स खेळणी यामुळे वातावरण भरून जाते. गेल्या दोन वर्षात कोवीडच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा विठ्ठल वाडीत भरली नव्हती .

त्यामुळे दोन वर्षांनी भरणाऱ्या यंदाच्या आषाढी एकादशीच्या जत्रेला विशेष महत्त्व आहे. भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. त्यांच्या या उत्सवासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. विविध सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठान, संघ, विविध ग्रुप, यांच्यासोबतच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आपली येथे सेवा रुजू करतात. विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. मोठी उलाढाल या दिवशी होते. मंदिर परिसरात लहान मुलांसाठीची खेळणी सज्ज असतात. अशा या जत्रेत जाऊन विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाचा प्रसाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com