
Devotional quotes for Vitthal Mauli in Marathi: हिंदू धर्मात आषाढी एकादशीला खुप महत्व आहे. प्रत्येक महिन्यात शुल्क पक्षातील एकादशी तिथीला विष्णू देवाला समर्पित असून त्यादिवशी उपवास केला जातो. ही एकादशी सर्वात मोठी मानली जाते.आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगिनीद्रामध्ये जातात आणि कार्तिक एकादशीला ते निद्रेतून जागे होतात. यंदा आषाढी एकादशी ६ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात अलोट गर्दी पाहायला मिळते. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही मराठीतून खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.