Ashadi Wari 2023 : वारीच्या वाटेवर परमोच्च आनंदोत्सव; उभे रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी

भंडीशेगावच्या तळावर सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या
ashadi wari 2023 Bhandishegaon wari ringan warkari entry today in pandharpur
ashadi wari 2023 Bhandishegaon wari ringan warkari entry today in pandharpursakal

वाखरी : टाळ मृदंगाच्या साथीला माऊली नाम...काळ्याभोर ढगांच्या साथीला लाखो भाविकांची दाटी, अशा जल्लोषात वारीच्या वाटेवरील आनंदाचा परमोच्च बिंदू असलेल्या वाखरीच्या रिंगणात माऊलींच्या अश्वाने वेगात तीन फेऱ्या मारल्या अन् वारकऱ्यांच्या लक्ष लक्ष नयनांनी आनंदोत्सव अनुभवला.

उभ्या आणि गोल रिंगणात देहभान विसरुन नाचणारे वैष्णव धावतच पंढरीसमीप वाखरी येथे मुक्कामी दाखल झाले.

भंडीशेगावच्या तळावर सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कांदेनवमीनिमित्त आज पालखी तळावर दिंड्यांमध्ये जेवणामध्ये कांदाभजीचा बेत होता. जेवणानंतर दुपारी एक वाजता निघालेला पालखी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला.

ashadi wari 2023 Bhandishegaon wari ringan warkari entry today in pandharpur
Ashadi Wari 2023 : 'प्रेम अमृताची धार' याची अनुभूती; अकलूजच्या रिंगणावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

बाजीरावच्या विहिरीजवळ झालेल्या उड्डाणपुलाजवळ पालखी सोहळा दुपारी चार वाजता पोचला. रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी सकाळपासूनच वारकऱ्यांनी गर्दी केली होती. तेथे माऊलींचे उभे रिंगण रंगले. यावेळी भाविक उड्डाणपुलावर उभे होते.

उभे रिंगण झाल्यानंतर गोल रिंगणासाठी सोहळा सव्वाचार वाजता दाखल झाला. गोलाकार दिंड्यांतून वाट काढीत पालखी मध्यभागी ठेवण्यात आली. अश्व रिंगणात आले; पण गर्दीमुळे रिंगण लावणे अवघड जात होते.

ashadi wari 2023 Bhandishegaon wari ringan warkari entry today in pandharpur
Ashadi Wari 2023 : माउलीच्या हाकेला धावली ‘माउली’; हरवलेला मुलगा सापडल्याने मातेला आनंद

त्यानंतर भोपळे दिंडीच्या मानकऱ्यांनी रिंगणाला तीन प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर स्वाराच्या अश्‍वासह माऊलींच्या अश्‍वाने धावण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीत काहीशा मागे पडलेला माऊलींच्या अश्‍वाने नंतरच्या दोन फेऱ्यांत स्वाराच्या अश्‍वाला मागे टाकले.

तीन फेऱ्यानंतर माऊलींच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. त्यानंतर दिंड्यांमध्ये वारकऱ्यांचे पावक्या, खो-खो, फुगड्या खेळ सुरू होते. देहभान विसरून वारकरी नाचत होते.

ashadi wari 2023 Bhandishegaon wari ringan warkari entry today in pandharpur
Ashadi Wari 2023 : विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी, गजानन महाराज पालखीचे माचनूर येथे स्वागत...

पंढरी समीप आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सायंकाळी सहा वाजता उडीच्या कार्यक्रमाने रिंगणाची सांगता झाली. त्यानंतर अगदी धावातच सोहळा वाखरी मुक्कामी विसावला.

आज पंढरी प्रवेश

आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर १७ दिवसांची वाटचाल करीत माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी (ता.२८) पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी इसबावीजवळ माऊलींच्या सोहळ्यातील तिसरे उभे रिंगण होणार आहे.

वारीची वाटचाल

  • ढगाळ हवामानामुळे चालणे सुखकर

  • बाजीरावच्या विहिरीजवळ पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी

  • सुमारे २०-२२ ड्रोनच्या घिरट्या

  • रस्ता रुंदीकरणामुळे दिंड्यांची वाहतूक सुलभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com