एखाद्यावेळेस चंद्रावर जाणं सोप आहे पण एखाद्याकडून उधारीचे पैसे परत मिळवणं अवघड आहे. कारण लोक गोड बोलून, अडचणींचा पाढा वाचून पैसे घेऊन जातात पण ते परत देण्याची वेळ आली की 'तारीख पे तारीख' देतात.
लोकांच्या उधारी बुडवण्यावरून अनेक जोक्स आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात. पण ही खरच खूप गंभीर गोष्ट आहे. लोक भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन अनेकांना फसवतात. लाखो रुपयांची उधारी करून त्यातील एकही रुपया परत येत नाहीत.