Bail Pola 2022: पोळा स्पेशल ताकाची कढी कशी तयार करतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bail Pola 2022

Bail Pola 2022: पोळा स्पेशल ताकाची कढी कशी तयार करतात?

महाराष्ट्रासह देशातील विविध भागात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातोअशी आहे परंपरा ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळण्यात येते त्याला खांदमळणी असे म्हणतात.

चला तर मग बैलांच्या खांदमळणीला लागणारी आणि पुरणपोळी सोबत अप्रतिम लागणारी ताकाची कढी कशी तयार करायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत.

हेही वाचा: Bail Pola 2022: विदर्भातील गावामध्ये कसा साजरा होतो बैलपोळा?

साहित्य:

● अर्धा लिटर ताक

● तिन ते चार चमचे बेसन

● तिन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे

● कढी पत्याची पाने

● अर्धा चमचा मोहरी

● अर्धा चमचा जिरे

● अर्धा चमचा हिंग

● पाव चमचा हळद

● कोथिंबीर आल्याचे तुकडे

● ठेचलेला लसूणतेल

● थोडीशी साखर (चिमूटभर)

●चवीनुसार मीठ,

कृती:
सर्वप्रथम ताकासाठी थोडं आंबट दही घ्या आणि ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्या.

त्यानंतर ताकामध्ये बेसन, साखर, मीठ, आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून, मीठ हे सर्व त्यामध्ये मिक्स कराबेसन मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या राहू देऊ नका.

दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवा आणि त्यात तेल घालातेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कडिपत्ता घाला आणि वरून तयार केलेले ताक फोडणीला द्या त्यानंतर कढीला उकळी येऊ द्या.

वरून कोथिंबीर घाला आणि मिक्स करून मस्तपैकी गरमागरम सर्व्ह करा

Web Title: Bail Pola 2022 How To Prepare The Special Buttermilk Curry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..