

छत्रपती संभाजीनगर - एरवी जेवणाच्या ताटापासून परक्यासारखी दूर राहिलेली बाजरी थंडीच्या दिवसांत मानाचे पान पटकावते, ती आवर्जून खाल्ली जाते. बाजरीची भाकरी, बाजरीची उसळ, मोठ्या चवीने खाल्ली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी बाजरी उपयुक्त असते.