Vastu Tips : घरी देवघर बांधण्यापूर्वी 'हे' नियम जरुर जाणून घ्या, सुख-शांती मिळेल

नियमित पूजा-अर्चा करूनही घरात सुख-शांती नांदत नाही किंवा काही अडचणींचा समाना करावा लोगतो.
Vastu Tips for puja ghar or dev ghar
Vastu Tips for puja ghar or dev ghar

प्रत्येक घरात पूजेसाठी एक ठिकाण, स्थान किंवा देवघर असते. तेथे नियमित अनेक देवतांची पूजा केली जाते आणि धूप-दिवे लावले जातात. कधीतरी असेही घडते की, नियमित पूजा-अर्चा करूनही घरात सुख-शांती नांदत नाही किंवा काही अडचणींचा समाना करावा लोगतो. याचे कारण म्हणजे वास्तुशास्त्रातील दोष. जर तुमच्या घरात योग्य ठिकाणी देवघर बांधले नाही तर त्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि पूजा केल्याचे योग्य फळ मिळत नाही.

पूजेचे ठिकाण हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे पूजेचे घर बनवताना वास्तूशास्त्राचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूजास्थान कोठे असावे आणि देवघर बांधत असताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आपण आज जाणून घेणार आहोत...

Vastu Tips for puja ghar or dev ghar
Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधी 'या' वास्तु टिप्सचे करा पालन, घरी सुख-समृद्धी नांदेल

घरातील मंदिरासाठी योग्य स्थान आणि दिशा

पूजेचे घर कधीही बेडरूममध्ये, पायऱ्यांखाली, स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या आजूबाजूला बनवू नये. याशिवाय घराच्या नैऋत्य दिशेलाही ते बांधू नये. वास्तूनुसार, ईशान्य दिशेला पूजाघर बांधणे सर्वोत्तम मानले जाते. कारण या दिशेमध्ये ऊर्जेचे भांडार असते आणि या दिशेला देव दिशा म्हणतात. जर काही कारणास्तव या दिशेला पूजेचे घर बांधणे अशक्य असेल तर तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेलाही पूजा घर बांधू शकता.

पूजा घर किती उंचीवर असावे

घरामध्ये पूजेसाठी मंदिर बांधताना लक्षात ठेवा की मंदिर जमिनीवर असू नये कारण देवाचे स्थान उच्च आणि सर्वोच्च आहे. त्यामुळे त्यांची जागा कधीही जमिनीवर नसावी. देवाची मूर्ती किंवा चित्र किमान एका पोस्टमध्ये लावावे. वास्तूनुसार पूजा घराची उंची देवाच्या चरणांची आणि हृदयाची पातळी समान असावी.

पूजा घरासाठी रंगांचे महत्त्व

घराच्या इतर खोल्यांसाठी आम्ही ज्याप्रकारे रंगांच्या निवडीकडे लक्ष देतो. देवघरासाठी रंगांनाही महत्त्व आहे. वास्तूनुसार, पूजेसाठी पांढरा, पिवळा, हलका निळा आणि केशरी रंग उत्तम असतात. तसेच येथे तुम्ही पांढऱ्या रंगाचे दिवे लावू शकता. मंदिरात काळा, तपकिरी किंवा कोणताही गडद रंग वापरू नये.

Vastu Tips for puja ghar or dev ghar
Vastu Tips : सुख-समृद्धी ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर ही धार्मिक चिन्हे लावावीत

पूजा घराला स्टोअर रूम बनवू नका

काही लोकांना असे वाटते की जर पूजा घरामध्ये जागा असेल तर त्यामध्ये अनावश्यक गोष्टीही ठेवल्या जाऊ शकतात. त्यामुळे घरचे रेशन, पुस्तके, कपडे किंवा इतर वस्तूही ते इथेच ठेवतात. पण असं अजिबात करू नका. असे केल्याने घरात सकारात्मकता येत नाही. तसेच पूजेच्या घरात पितरांचे चित्र ठेवू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com