
Buddha Purnima 2025: बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी खुप महत्वाचा दिवस आहे. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता, ज्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार देखील मानलं जातं.
बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व केवळ त्यांच्या जन्मापुरते मर्यादित नाही तर या दिवसाचे पावित्र्य देखील विशेष आहे. कारण याच दिवशी भगवान बुद्धांना बोधगया येथील बोधिवृक्षाखाली तीव्र तपश्चर्येनंतर सत्य आणि ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांनी जीवन, दुःख आणि मुक्तीचे गूढ रहस्य समजून घेतले आणि मानवतेला धर्माचा मार्ग दाखवला.
बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हा दिवस ध्यान, तपस्या आणि करुणेचे प्रतीक आहे तर हिंदू धर्मात तो देवाचा अवतार म्हणून पूजला जातो. या दिवशी बरेच लोक सत्य, अहिंसा आणि संयमाचे व्रत पाळून पुण्य कमावतात. बुद्ध पौर्णिमा हा आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक जागृतीचा एक विशेष प्रसंग मानला जातो. यंदा बुद्ध पौर्णिमा कधी आहे आणि याचे महत्व काय हे सविस्तरपणे जाणून घेऊया.