

Capricorn weekly horoscope 5 to 11 April 2026
esakal
मकर राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सकारात्मक राहणार आहे. या आठवड्यात तुमचा आर्थिक ओघ कायम राहील, त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील. कामगारवर्गाशी संबंधित प्रश्न सुटतील आणि व्यवसायातील अडथळे कमी होतील. या काळात प्रलंबित येणी किंवा वादग्रस्त व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणाच होईल. काहींना बदलीमुळे लाभ मिळेल, तर काहींसाठी नवीन जबाबदाऱ्या प्रगतीचा मार्ग उघडतील.