Champa Shashti : नवसाला पावणारा ओझरचा खंडोबा

Champa Shashti
Champa Shashtiesakal

ओझर : जेजुरीनंतर भरणारी पहिली यात्रा, ओझरकरांचे ग्रामदैवत तथा परिसरात व पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, आशास्थान, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज हे ओझर परिसरात एक जागृत दैवत नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे.
ओझरचा यात्रोत्सव चंपाषष्ठीपासून पांच दिवस असतो. खंडेराव महाराजांनी मणी माल्ल्याच्या वध केल्यामुळे पारंपरिकरीत्या ओझर परिसरातल्या यात्रोत्सवाची सुरवात व विविध महत्त्व प्राप्त झाले आहे. यात्रोत्सव लहान स्वरूपात होत असे मात्र काळानुरूप बदल होऊन यात्रेचे स्वरूप वाढत गेले. भाविकांचे हाल लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य व आकर्षक मंदिराची बांधणी झाली.

Champa Shashti
Champa Shashti : चंपाषष्ठीला तळी भरलीच पाहीजे; जाणून घ्या संपुर्ण विधी


मंदिरासमोर मल्हार रथ ओढणाऱ्या घोड्याची समाधी व भव्यदिव्य स्तंभ आहे.
माणसांनी खच्चून भरलेले मल्हाररथ एक घोडा (अश्व) ओढतो. मल्हाररथ ओढण्याची परंपरा दोन अडीचशे वर्षांपेक्षा अधिक आहे, यात्रेतील रथ ओढण्याचा मान घोड्यास दिला जातो.
महाराजांचा अश्वरथ सांभाळण्याचे काम परंपरागत चालीरीतीने आदिवासी समाजाकडे आहे. चंपाषष्ठीपर्यंत सहा दिवसांचा हा विधी असल्याने यास षष्ठ यात्रोत्सव असेही म्हटले जाते.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

यात्रेच्या दिवशी घोड्यास सकाळी हळद अंघोळ घालून दोन्ही मंदिरात देवभेट केली जाते. दुपारी मारुती मंदिरात भेट घेऊन वाजतगाजत या घोड्यांची पालक व पालखीची गावातून मिरवणूक काढतात. भंडाऱ्याची उधळण करीत ‘खंडेराव महाराज की जय’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो. भाविकांची अशी श्रद्धा आहे, की स्वत: महाराज या मानाच्या घोड्यास बारागाड्या ओढण्याची प्रेरणा देतात.


बारागाडे म्हणून ज्या रथांना ओढले जातात ते रथ वाजत गाजत मिरवणुकीने यात्रा मैदानावर आणले जातात. मध्यभागी एक नक्षीदार भरीव व लाकडी खांब उभा केलेला असतो. खांबाचा वरच्या टोकास लोखंडी रिंग बसून उभा आरव बसवतात. त्यावर एक चोपा बसून लाकडी खांब उभा केलेला असतो. खांबांचा वरचा टोकावर लाकडी रिंग बसून उभा आरोप बसवतात व त्यावर एक चाक बसून लाकडी चोपा बांधून प्रत्येकाचा टोकाला एक सोटगा अडकवतात. हा शो टाका म्हणजे झुलता फिरता मल्लखांब. यावर मिरवणुकींचा वेळी मल्ल्या कसरत करतात.

Champa Shashti
Champa Shashti : ज्याने पाहिली नाही जेजुरी, त्याने पहावी चांदोरी

रात्री मंदिरासमोर मल्हार भक्तांसह ग्रामस्थ जागरण गोंधळ करतात. दुसऱ्या दिवशी मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम दुपारी कुस्त्यांची विराट दंगल होते. यात्रेत उंच पाळणे, मौत का कुंवा, जादूची नगरी विविध प्रकारची खेळणी, मिठाईचे दुकान, गृहोपयोगी वस्तू गर्दी खेचून घेतात. यात्रा कमिटी, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, पोलिस खाते ग्रामस्थ अतिशय शिस्तबद्ध नियोजन करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com