

Chanakya Niti Identify Fake People
Sakal
Chanakya Niti Human Nature : आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये माणसाचा स्वभाव, त्याचे वागणे आणि योग्य व्यक्तीची निवड याबाबत अनेक विचार सांगितले आहेत. एखादी व्यक्ती आपल्याशी गोड बोलते, आपली सतत स्तुती करते म्हणून ती खरी असेलच असे नाही. काही वेळा लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी गोड बोलतात. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या वागण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.