Chanakya Niti : तरुणांनो! उज्ज्वल भविष्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टींपासून दूर रहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chanakya Niti

Chanakya Niti : तरुणांनो! उज्ज्वल भविष्याच्या विचारात असाल तर 'या' गोष्टींपासून दूर रहा

आजचे तरुण हे उद्याच्या देशाचे भविष्य आहेत असे म्हटंले जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे जीवन समृद्ध होते. जीवनात असा एक टप्पा येतो ज्यामुळे काही गोष्टी एखाद्या व्यक्तीला विचलित करण्याचे काम करतात. यासंदर्भात चाणक्य म्हणतात की, तरुणांना यशस्वी व्यक्ती बनवायचे असेल तर त्यांनी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. अन्यथा वर्तमानासह भविष्यही अडचणीत पडू शकेल. त्यामुळे तरुणांनी कोणत्या गोष्टीपासून दूर रहावे हे चाणक्यांनी सांगितले आहे. ते आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत..

आळस

तरुण पिढीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस. तारुण्यात कष्ट केले तर म्हातारपण सुधारते असे म्हणतात. चाणक्य म्हणतात की, आळस तरुणांना यशस्वी होण्यापासून रोखतो. माणूस जितका शिस्तप्रिय असेल तितकी प्रगती त्याच्या जवळपास खेळत राहते. कारण वेळ ही खूप मौल्यवान असल्याने तिचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. तारुण्यात केलेला संघर्ष तरुणांचे भविष्य सुधारण्यास मदत करतो. तुम्ही आळसातून काहीही कमवू शकणार नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही सदैव सक्रिय असले पाहिजे.

हेही वाचा: Beard : एखाद्या फिल्मी हिरोसारखी दाढी ठेवण्यासाठी मदत करतील 'या' सोप्या टिप्स

राग

यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे राग. क्रोध व्यक्तीची बुद्धी कमकुवत करते. लहान असो किंवा मोठा रागामुळे सर्वांचे नुकसान होते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवायला शिका नाहीतर तुमची एक चूक तुमचे करिअर संपवू शकते. राग तरुणांच्या प्रगतीत अडथळा आणतो. जर तुमचा स्वभाव रागीट असेल तर तुमच्या वागण्याचा फायदा इतरही घेऊ शकतात.

संगत

चांगल्या आणि वाईट संगतीचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. चुकीच्या संगतीमुळे व्यक्तीमध्ये वाईट कृत्ये करण्याची विचारसरणी निर्माण होते. नशा, सेक्स, भांडण, वाद या गोष्टींपासून जितके दूर रहाल तितके यशाच्या शिखराकडे जात रहाल. तारुण्यातच एखाद्या व्यक्तीची दिशा आणि स्थिती ठरते. कारण या वयातील लोकांना स्वतःचे चांगले-वाईट समजते. यादरम्यान, आपल्या चुकीच्या सवयींवर कुणी सांगत असूनही दुर्लक्ष केले तर भविष्यात पश्चात्ताप करावा लागतो.

हेही वाचा: Pottery : मातीच्या भांड्यांत पदार्थ शिजवण्याचे पाच आश्चर्यकारक फायदे, कोणते पहा..

Web Title: Chanakya Niti Laziness Wrong Friend Divert Your Mind In Career Phase What Is Remedies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyleYouthyoung