Chanakya Niti: प्रत्येक ठिकाणी बोलणे मूर्खपणा! न मागता सल्ला द्याल तर तोंडावर पडाल; चाणक्यांनी सांगितलेत मौनाचे ६ नियम...

When to Keep Quiet: 'कधी, कुठे आणि कोणासमोर शांत राहावे?' हे शिकणे का आहे गरजेचे? जाणून घ्या चाणक्य नीतीमधील मौनाचे अनन्यसाधारण महत्त्व...
Chanakya Niti 6 Rules

Chanakya Niti: 6 Rules of Silence & Why Unsolicited Advice Fails

esakal 

Updated on: 

Chanakya Niti Life Lessons: आयुष्यात 'न बोलून शहाणा होणे' ही फक्त एक म्हण नसून तो जगण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. सगळ्यांनीच प्रत्येक विषयात आणि प्रत्येक ठिकाणी आपले विचार मांडले पाहिजेत असा कोणताही नियम नाही. इंग्रजीत एक सुंदर म्हण आहे, 'Speak only when your words are more beautiful than silence' म्हणजेच तेव्हाच बोला जेव्हा तुमचे शब्द तुमच्या मौनापेक्षा अधिक सुंदर असतील. याचा साधा अर्थ असा की, नेहमी कमी बोला आणि जिथे खरोखर गरज असेल तिथेच बोला.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जिथे तिथे आपले विचार मांडल्यामुळे किंवा न मागितलेला सल्ला दिल्यामुळे आपल्याच शब्दांना किंमत उरत नाही. अनेक प्रसंगी शब्दांपेक्षा तुमचे मौन अधिक प्रभावी ठरते. अकारण आपली मतं लादल्यामुळे वाद निर्माण होतात आणि शेवटी माणसाला तोंडावर आपटावे लागते. तुमचा कधीही अपमान होऊ नये आणि तुम्ही संकटात अडकू नये, यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले ६ महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com