Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहण संपताच करा हे उपाय, अन्यथा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandra Grahan 2022

Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहण संपताच करा हे उपाय, अन्यथा...

Chandra Grahan 2022 : आज वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होत आहे. भारतात खंडग्रास चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. याचा वेध काळ ९ तासाचा असल्यामुळे अनेक नियम या काळात पाळले जातात. धार्मिक शास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला फार महत्वाची घटना मानलं आहे. याकाळात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला असतो असं मानलं जातं.

त्यामुळे जसे काही नियम या काळात पाळले जातात तसेच काही ग्रहण सुटल्यावरही पाळणे आवश्यक असतात. त्यामुळे ग्रहण संपताच काही नियम पाळणं गरजेचं असतं. ज्यामुळे ग्रहण काळातले दुष्परिणाम दूर होतात. जाणून घ्या ग्रहण संपताच काय करावं.

हेही वाचा - कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

  • ग्रहण संपताच सर्वप्रथम पाण्यात गंगाजल आणि तुळस टाकून आंघोळ करावी

  • घराची साफसाफई करावी. त्यामुळे घरातली नकारात्मकता बाहेर निघून जाते.

  • संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा

  • देवघरात व देवांच्या मूर्तींवर गंगाजल शिंपडा.

  • ग्रहण संपल्यावर दानाला महत्व आहे. गहू, तीळ, गुळ, अन्न दान करावं.

  • स्नान, दान, साफसफाईनंतर पूजा करा. यामुळे सकारात्मकता वाढते.

टॅग्स :Lunar Eclipse