

Chaturmas 2026 Starts
esakal
Sacred 4 Months: यंदा 'चातुर्मासाला' २५ जुलै २०२६ (शनिवार) म्हणजेच आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) पासून सुरुवात होत आहे. पुढील चार महिने म्हणजेच २० नोव्हेंबर २०२६ (कार्तिकी प्रबोधनी एकादशी) पर्यंत हा काळ असेल. या चार महिन्यांच्या कालावधीला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. या काळात नेमके काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊया.
धार्मिक मान्यतेनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योगनिद्रेत (कोस्मिक स्लीप) जातात. या काळात सृष्टीचे संचालन करण्याची जबाबदारी भगवान शिव आणि त्यांच्या परिवारावर असते. यामुळेच चातुर्मासात महादेवाचे प्रिय सण आणि उपवास मोठ्या प्रमाणात केले जातात.