
Panchang 10 March : आज कोणतेही महत्त्वाचे काम 'या' वेळेत करावे, कार्यसिद्धी होणार
पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० मार्च २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन १९ शके १९४४
आज सूर्योदय ०६:५१ वाजता तर सूर्यास्त १८:३९ वाजता होणार. चंद्रोदयाची वेळ ही २१:११ वाजता आहे तर प्रात: संध्या ही स.०५:३८ ते स.०६:५१ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:३९ ते १९:५२ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा आज १३:५६ ते १६:१८ दरम्यान असणार. प्रदोषकाळची वेळ ही १८:३९ ते २१:०५ दरम्यान आहे तर निशीथ काळ हा २४:२० ते २५:०९ दरम्यान आहे. आज राहु काळ हा ११:१६ ते १२:४५ या दरम्यान होणार तर यमघंट काळ हा १५:४२ ते १७:११ दरम्यान असणार.
आज श्राद्धतिथी ही तृतीया श्राद्ध आहे.सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५६ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 10 March 2023)
लाभदायक
लाभ मुहूर्त - ०८:१९ ते ०९:४८
अमृत मुहूर्त - ०९:४८ ते ११:१६
विजय मुहूर्त - १४:४३ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही. मंगळ मुखात आहुती आहे. शिववास २०:१९ प.क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी २०:१९ प. प्रतिकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - शिशिर(सौर)
मास - फाल्गुन
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया(२०:१९ प.नं.चतुर्थी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - चित्रा(२९:५५ प.नं.स्वाती)
योग - वृद्धि(१९:४७ प.नं. ध्रुव)
करण - वणिज(०८:११ प.नं.भद्रा)
चंद्र रास - कन्या(१७:३४ नं.तुळ)
सूर्य रास - कुंभ
गुरु रास - मीन
विशेष:- भद्रा ०८:११ ते २०:१९, संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय रा.०९:११), कल्पादि, छत्रपती शिवाजी महाराज जयंती
या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.
दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना साखर खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष , कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना सायं.०५:३४ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com