Panchang 10th sept: या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

Panchang 10th sept: या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग १० सप्टेंबर २०२२

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० सप्टेंबर २०२२ (daily panchang 10 sept 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १९ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२५ वाजता तर सूर्यास्त १८:३८ वाजता होणार. आज चंद्रोदय हा १८:५६ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२५ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही  १८:३८ ते १९:४९ दरम्यान असणार तर आज अपराण्हकाळ हा १३:४५ ते १६:११ दरम्यान असणार आज प्रदोषकाळ हा १८:३८ ते २०:५९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०८ ते २४:५५ दरम्यान असणार. आज राहु काळ हा ०९:२८ ते ११:०० दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १४:०३ ते १५:३५ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी  ही पौर्णिमा-प्रतिपदा श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०१ ते दु.०१:४५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तीळ खावू नये. या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Panchang 9th sept: या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १४:०३ ते १५:३५

  • अमृत मुहूर्त-- १५:३५ ते १७:०६

  • विजय मुहूर्त— १४:३४ ते १५:२२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर चंद्र मुखात आहुती आहे. शिववास १५:३७ प.स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी १५:३७ प.प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पौर्णिमा(१५:३७ प.नं. प्रतिपदा)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - शततारका(१०:३७ प.नं.पूर्वाभाद्रपदा)

  • योग - धृति(१७:०३ प.नं.शूल)

  • करण - बव(१५:३७ प.नं. बालव)

  • चंद्र रास - कुंभ (२७:५६ नं.मीन)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Pitru Paksha : यंदा 'या' तारखांना केले जाईल श्राद्ध

विशेष:- स्नान दानासाठी पौर्णिमा, प्रौष्ठपदी श्राद्ध, महालयारंभ, पौर्णिमा-प्रतिपदा श्राद्ध, अथर्ववेदी उपाकर्म, अन्वाधान, पंचक नक्षत्र सुरू आहे

या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. शनिदेवीस उडीदवड्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे. दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 10 September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang