Panchang 2 May : आज मंगळवारी लाल वस्त्र परीधान करा, दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchang esakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २ मे २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १२ शके १९४५

आज सूर्योदय ०६:११ वाजता तर सूर्यास्त १८:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळी ही १६:०५ वाजता होणार तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:०३ ते स.०६:११ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५३ ते २०:०१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४८ ते १६:२० दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:५३ ते २१:०९ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १५:४२ ते १७:१७ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०९:२१ ते १०:५६ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही द्वादशी श्राद्ध असणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मसूर खावू नये. या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे. (Daily Panchang 2 May 2023 )

Daily Panchang
Astrology : या 4 राशींची मुलं असतात फारच प्रामाणिक, त्यांच्यात असतात Best Husband क्वॉलिटीज

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १०:५६ ते १२:३२

  • अमृत मुहूर्त - १२:३२ ते १४:०७

  • विजय मुहूर्त - १४:३९ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास २२:१९ प. शनि मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(२२:१९ प.नं. त्रयोदशी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - उत्तराफाल्गुनी(१८:४४ प.नं.हस्त)

  • योग - व्याघात(१०:५४ प.नं. हर्षण)

  • करण - बव(०९:४२ प.नं.बालव)

  • चंद्र रास - कन्या

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

Daily Panchang
Panchang 1 May : महाराष्ट्र दिनी पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाणार

पंचांगकर्ते: सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर *डॉ.पं.गौरव देशपांडे

विशेष:- विष्णू पूजनाने अग्निष्टोम यज्ञ फलप्राप्ती, पितितक द्वादशी, गुरू बालत्व निवृत्ति, प.प श्री लोकनाथतीर्थ स्वामी जयंती, त्रिपुष्करयोग १८:४४ प.

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस लाडूचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️खगोल अभ्यासक व देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com