Panchang 3 December : शनिवारी निळे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४६ ते दु.०१:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily Panchangsakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण १२ शके १९४४

आज सूर्योदय ०६:५६ वाजता तर सूर्यास्त १७:५३ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १४:४२ आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:३८ ते स.०६:५६ दरम्यान होणार तर सायं संध्या ही  १७:५३ ते १९:११ दरम्यान होणार. आज अपराण्हकाळ हा १३:३० ते १५:४२ दरम्यान होणार तर आज प्रदोषकाळ हा १७:५३ ते २०:३० दरम्यान आहे. आज निशीथ काळ हा २३:५९ ते २४:५१ दरम्यान आहे तर राहु काळ हा ०९:४० ते ११:०२ दरम्यान आहे.

आज यमघंट काळ हा १३:४७ ते १५:०९ दरम्यान आहे तर आज श्राद्धतिथी ही एकादशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी स.०९:३० प.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४६ ते दु.०१:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी पडवळ खावू नये.या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे. (daily panchang 3 December 2022)

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १३:४७ ते १५:०९

  • अमृत मुहूर्त -  १५:०९ ते १६:३१

  • विजय मुहूर्त - १४:१४ ते १४:५८

पृथ्वीवर अग्निवास स.०८:१७ नं. शनि मुखात आहुती आहे. शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - हेमंत(सौर)

  • मास - मार्गशीर्ष

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - दशमी(०८:१७ प.नं.एकादशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - उत्तराभाद्रपदा(०८:५६ प.नं. रेवती)

  • योग - सिद्धि(०९:३० प.नं.व्यतिपात)

  • करण - गरज(०८:१७ प.नं.वणिज)

  • चंद्र रास - मीन

  • सूर्य रास - वृश्चिक

  • गुरु रास - मीन

Daily Panchang
Panchang 2 December : आज पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

विशेष:- भद्रा १९:४९ नं., स्मार्त मोक्षदा एकादशी, दशादित्यव्रत, सूर्याचा ज्येष्ठा नक्षत्र प्रवेश १७:०१, रवियोग(अहोरात्र), दग्धयोग ०८:५६ नं. या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे. शनिवज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे. दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com