
Datta Jayanti 2022 : दत्त महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तूम्ही पाहिल्यात का?
दत्तसंप्रदाय जगभर पसरलेला आहे. अगदी नेपाळमध्येही भाटगाव या शहरात दत्तांचे सुरेख मंदिर उभे आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तर दत्तभक्ती एवढी खोलवर रुजली आहे की दत्तात्रयांची मंदिरे आपल्याला गावोगावी आणि शहरांमध्ये तर चौका चौकात दिसतात.
दत्त महाराज म्हणजे सर्वांचे गुरू त्यामूळे पुराणातही त्यांना विशेष महत्त्व आहे. दत्त महाराजांच्या विचारांचा प्रसार करणारे,त्यांचा अवतार रूपी पून्हा जन्म घेणारे अनेक साधू, संत आणि अवतार पुरुष आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी, पैजारवाडीचे दत्त चिले अशा अत्यंत उच्चकोटीच्या दत्त अवतारांमुळे दत्तगुरूंची ख्याती जगभर पसरली आहे. भारतात काही ठिकाणी अशा दत्तत्रयांच्या मूर्ती आहेत ज्या त्यांचे वेगळेपण दाखवतात. त्यापैकीच काही खास मूर्ती आणि त्यांची महती आज श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने पाहुयात
हेही वाचा: Datta Jayanti 2022 : श्री गुरूदेव दत्त अन् गुरूवारचं नातं नेमकं काय?
२५ मुखी दत्तांची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
आजवर केवळ एकमूखी किंवा तीन मूखी दत्त मूर्ती तूम्ही पाहिली असेल. पण, ही २५ मूखी दत्त महाराजांची मूर्ती पाहुन तूम्हालाही कुतूहल वाटेल. तर ही मूर्ती तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात श्री स्वामी सदाशिव ब्रह्मेंद्र महाराज मंदिरात आहे. दत्त सांप्रदायात या मूर्तीला विशेष महत्त्व आहे.

Datta Murti In Tamilnadu
हेही वाचा: Datta Jayanti 2022: श्री दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे संदेश...
दत्त महाराजांची सुवर्ण मूर्ती
दत्त महाराजांची पूर्ण सोन्याची मूर्ती कणकवली जानवल या ठिकाणी आहे. कृष्णनगरीतील श्री मोहिते यांना ती त्यांच्या घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना 3.5 फुटावर जमिनीत सापडली. पूर्णपणे सोन्याची असलेली ही स्वयंभू दत्तात्रयांची मूर्ती एका हाताने उचलत नाही एवढी जड आहे, आणि वजन काट्यावर ठेवली तर तिचे वजन शून्य दिसते. हा एक चमत्कारच मानला जातो.

Datta Murti in kokan
श्री स्वामी समर्थांचा मणी व दत्तांची रेखीव मूर्ती
बेळगावमध्ये त्रिपुरीसुंदरी येथे दत्त महाराजांची ही रेखीव आणि सुरेख मूर्ती आहे. या मठातच श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता मणी आहे. स्वत: स्वामिंनी दृष्टांत देऊन मणी कुठे आहे हे किरण स्वामी यांना सांगितला. तेव्हापासून हा मणी इथे पूजला जातो. तसेच, तिथे मठ बांधून दत्तांची कोणत्या रूपातील मूर्ती असावी हेही सांगितले.

Datta Murti in Belagavi
हेही वाचा: Datta Jayanti 2022: दत्तात्रेय यांचे 52 श्लोकी गुरुचरित्र...
१०० वर्षे जूनी दत्त महाराजांची मूर्ती
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी हूशंगाबाद, मध्यप्रदेश इथे ही एकमूखी दत्ताची मूर्ती स्थापन केली. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांना गंगा मातेने स्वयः दर्शन देऊन त्यांना नर्मदा मातेची ऊपासना करण्याची प्रेरणा दिली. महाराजांनी ह्या स्थळी साधना, तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी आपले आराध्य दैवत श्री दत्तात्रयाच्या एक मूखी मूर्तीची स्थापना केली. हे मंदिर आणि मूर्ती १०० वर्षे जूने असल्याचे सांगितले जाते.

Datta Murti In MP