
आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हणून ओळखलं जातं. कारण आपल्या देशात गल्ली-बोळात,चौकात नदीघाटावर मंदिरांची नगरी वसलेली दिसते. या मंदिरांमुळेच आपल्या देशाला प्राचिनता लाभली आहे. आपल्या देशात गुरू दत्तात्रेयांची अनेक मंदिरे आहेत. काही मंदिरात दत्तांची तीन मुख असलेली मुर्ती असते तर काही ठिकाणी त्यांच्या पादुकांच्या प्रतिमेची पूजा केली जाते.
पण उत्तर भारतात असं मंदिर आहे जिथे एकमुखी दत्तांची मूर्ती पहायला मिळते. हे उत्तर भारतातील एकमेव मंदिर असल्याची चर्चा केली जाते. वाराणसीतील ब्रह्मा घाटावर दत्त महाराजांचे हे मंदिर आहे. केवळ मंदिर प्राचिन आहे असे नाही. तर इथे भाविकांना येणारे अनुभवही वेगळे आहेत. (Datta Maharaj Temple In Varanasi)