
महाकुंभनगर : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याची महाशिवरात्रीला सांगता झाल्यानंतरही अनेक भाविक येथे येऊन त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत. त्रिवेणी संगमाच्या किनाऱ्यावरील मैदान आता बऱ्यापैकी मोकळे झाले असून भाविकांना संगमाच्या अगदी जवळ वाहने आणता येत आहेत. त्याचप्रमाणे प्रशासनाने येथील वाहतुकीचे नियमही शिथिल केले आहेत.