देवउठनी एकादशी २०२६: सिद्धी योगासह नक्षत्रांचा दुर्मिळ संयोग; २० नोव्हेंबरपासून 'या' ३ राशींचे भाग्य उजळणार

देवउठनी एकादशीच्या मुहूर्तावर 'या' ३ राशींची चांदी; नोकरी-व्यवसायात प्रगतीसोबतच कुटुंबातही नांदणार सुख...
Devuthani Ekadashi 2026 Lucky Zodiac Signs & Yoga

Devuthani Ekadashi 2026: Lucky Zodiac Signs & Yoga

esakal 

Updated on: 

Lucky Zodiac Signs for Devuthani Ekadashi 2026: धर्मात देवउठनी एकादशीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचे कार्य सांभाळतात, अशी धारणा आहे. यंदा २० नोव्हेंबर २०२६ ला देवउठनी एकादशी येत असून, या दिवशी जुळून येणारा ग्रह-नक्षत्रांचा मेळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

यंदाच्या देवउठनी एकादशीला पूर्वाभाद्रपद आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांसोबत सिद्धी योगाचा शुभ संयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ योगाचा सकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येऊ शकतो. विशेषतः तीन राशींना आर्थिक स्थैर्य, करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळण्याचे संकेत आहेत.

Loading content, please wait...