
दिवाळीचा सण सध्या देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यादरम्यान आज (मंगळवार) धनत्रयोदशीला आपल्यापैकी अनेक जण मौल्यवान धातू जसे की सोने, चांदी यांच्यामध्ये गुंतवणूक करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.