हिंदू धर्मातील मंगलमय, आनंददायी सण दिवाळी. अंधार दूर सारून आसमंत प्रकाशमान करणारा हा दिव्यांच्या सणाचा सोहळा. यंदा हा सोहळा सात दिवसांचा आहे. प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. .शुक्रवारी (ता. १७) वसुबारस म्हणजे ग्रामीण भागात गायीला दही लागण्याचा दिवस. या दिवशी सवत्स धेनूचे पूजन केले जाते. वरदांबा ज्योतिष सल्लागार केंद्राचे विनोदशास्त्री पाठक (राक्षसभुवनकर) दिवाळीच्या सर्व दिवसांचे मुहूर्त आणि महत्त्व सांगताना म्हणाले, शनिवारी (ता. १८) धनत्रयोदशी आणि रविवारी (ता. १९) नरक चतुर्दशीचा दिवस आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून पृथ्वीवर प्रकाश आणि आनंद आणला, म्हणून या तिथीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी पहाटे तेल अभ्यंग स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शरीरशुद्धी आणि नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अभ्यंग स्नानानंतर देवतेची प्रार्थना, दिवे प्रज्वलित करणे आणि आरोग्याची कामना केली जाते..Diwali 2025 Diabetes Management Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींसनी फॉलो कराव्या 'या' स्मार्ट टिप्स.सोमवारी (ता. २०) अमावास्या. अमावास्येच्या दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो. या दिवशी घर स्वच्छ करून, देवघर सजवून, संध्याकाळी दिवे लावून लक्ष्मीमातेच्या आगमनाची तयारी केली जाते. अमावास्येच्या रात्री नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी दीपदान आणि शुद्धीकरणाचा विशेष विधी केला जातो.बलिप्रतिपदाबलिप्रतिपदा, पाडवा किंवा गोवर्धनपूजा बुधवारी (ता. २२) आहे. या दिवशी दानशूर बळीराजाची पूजा केली जाते. या दिवशी पती-पत्नी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दीर्घ दांपत्य आयुष्याची कामना करतात. कार्तिक शुक्ल प्रतिपदा या दिवशी भगवान विष्णूंनी वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात पाठवले, परंतु वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याचे वरदान दिले, अशी पुराणकथा आहे..भाऊबीजगुरुवारी (ता. २३) भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावंडांच्या प्रेमाचा हा सण म्हणून याला यमद्वितीया असे म्हणतात. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला तीळगूळ देणे, आरती ओवाळणे व भेटवस्तू देणे शुभ मानले जाते. हा दिवस प्रेम, स्नेह आणि कुटुंबीयांच्या ऐक्याचे प्रतीक आहे..दूर होते घरातील दारिद्र्यमंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन आणि वहीपूजनाचा म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस आहे. या दिवशी धन, सौभाग्य आणि वैभवाची देवी श्री महालक्ष्मी यांची पूजा आणि उत्सव साजरा केला जातो. विनोदशास्त्री पाठक म्हणाले, ‘या मुहूर्तात लक्ष्मी, कुबेर आणि गणपतीचे पूजन केल्याने घरातील दरिद्र्य दूर होते, धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आणि कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते; तसेच या दिवशी वहीपूजन केले जाते. या दिवशी व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार नवीन वही-खातेपुस्तकाचे पूजन करतात. श्री गणेश, सरस्वती आणि लक्ष्मी यांची प्रतिमा ठेवून ‘ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राने पूजा केली जाते. नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभ करण्यासाठी हा दिवस अत्यंत मंगलमय मानला जातो..दीपोत्सव महापुण्यम बलीराज प्रवर्तते। आनंद सर्वलोकानाम मंगलानि गृहे गृहे।। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावास्या (लक्ष्मीपूजन), बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे पाच मुख्य दिवस आहेत. या दिवाळीच्या दिवसांत घरातील प्रत्येक कोपरा प्रकाशमान करा. देवपूजा करा आणि मनात सद्भावना ठेवा.— विनोदशास्त्री पाठक गुरुजी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.