
Diwali Lakshmi Puja Guide
Sakal
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे, पणत्या आणि रांगोळ्यांनी सजावट करणे, शुभ मुहूर्तावर पूजा करणे आणि स्वच्छ साहित्य वापरणे आवश्यक आहे. या दिवशी आंघोळ करून दिवे लावणे शुभ मानले जाते. तुटलेल्या वस्तूंचा वापर टाळावा आणि देवघर स्वच्छ ठेवावे.
दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण... भारतातील सर्वात महत्वाचा सण..जो आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा २१ ऑक्टोबरला दिवळी साजरी केली जाणार आहे. हा सण वाइटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. हा सण कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणतो. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची पुजा केली जाते. असे मानले जाते की माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकमना पूर्ण होतात आणि समस्या दूर होतात. लक्ष्मीपूजनादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.