

Diwali 2026: Narak Chaturdashi & Laxmi Pujan on Same Day
esakal
Diwali 2026: यंदाच्या दिवाळी सणात एक अतिशय दुर्मिळ आणि अद्भुत योगायोग जुळून आला आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही प्रमुख सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत. चतुर्दशी तिथी आणि अमावस्या तिथी एकाच दिवशी आल्यामुळे पूजेच्या वेळेबाबत भाविकांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. या विशेष योगायोगामुळे यंदा अभ्यंगस्नान, यम दीपदान आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कसा असेल, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.