Diwali Astro Tips 2022 दिवाळीमध्ये हे उपाय केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali

Diwali Astro Tips 2022 : दिवाळीमध्ये हे उपाय केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होईल

संस्कृती : लक्ष्मी देवी ही आदिशक्तीचे रूप आहे, जी जगाला भौतिक सुख देते. वैभव, समृद्धी, अर्थ, साहित्य, रत्ने आणि धातू यांची प्रमुख देवता लक्ष्मी देवीला म्हणता येईल. या देवींच्या प्रभावाचे विस्तृत क्षेत्र पाहून असे म्हटले जाते की लक्ष्मीजींसोबत लक्ष गुण वास करतात. जगात कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही. यामुळेच प्रत्येकजण लक्ष्मीच्या साधनेत गुंतलेला असतो, कारण त्याला माहित असते की तिची कृपा होताच त्याचे दारिद्र्य दूर होईल आणि धनाची प्राप्ती होईल.

दिवाळीच्या पाच दिवसात मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी गणपतीसह लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मी प्राप्तीचे काही मार्ग सांगितलेले आहेत, जे केल्याने ती प्रसन्न होते आणि तिच्या कृपेचा वर्षाव होतो.नागकेसर, हळद, सुपारी, एक नाणे, तांब्याची वस्तु किंवा नाणे, तांदूळ कोऱ्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात ठेवून एक गाठोड तयार करा आणि हे गाठोडे शंभू शंकराच्या शिवलिंगासमोर ठेवा आणि उदबत्ती लावून पूजा करून सिद्ध करा आणि नंतर आपल्या घराच्या लॉकरमध्ये ठेवून द्या, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमचे संकट दूर करेल.

पाण्याच न सोललेल नारळ लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्याने संपत्ती वाढते. व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास व्यवसाय वाढेल.रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सगळी काम संपवून उत्तरेकडे तोंड करून पिवळ्या आसनावर बसावे. तुमच्या समोर तेलाचे नऊ दिवे लावा. दिव्यासमोर लाल तांदळाचा ढीग करून त्यावर श्रीयंत्र ठेवा. कुंकू, फुले, उदबत्ती, दिवा लावून त्यांची पूजा करा आणि त्यानंतर समोरच्या ताटात स्वस्तिक बनवून त्यांची पूजा करा, त्यानंतर दररोज नियमित पूजा करत राहा, याने तुम्हाला आर्थिक दृष्टीकोनातून चमत्कारिक परिणाम मिळतील.पैशाच्या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीची पूजा करा आणि दररोज पूजेच्या वेळी देवीच्या मूर्तीवर लवंग अर्पण करा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.