Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला 'या' ठिकाणी लावा पणती, लक्ष्मी देवीचा लाभेल आशीर्वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2022

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला 'या' ठिकाणी लावा पणती, लक्ष्मी देवीचा लाभेल आशीर्वाद

Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. या दिवसाशी निगडीत अनेक कथा आहेत. असं म्हणतात की, धनत्रयोदशीला समुद्रमंथनातून लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी बाहेर आले होते. म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी काही विशेष जागांवर दिवा, पणती लावल्यावर घरात सुख, शांती, समृध्दी प्राप्त होते.

'या' जागांवर लावा पणती

  • धनत्रयोदशीला देव घरात दिवा लावणं शुभ मानलं जातं. देवघरात दिवा लावल्याने वास्तूदोष दूर होतो. आर्थिक समृध्दी येते.

  • या दिवशी स्मशानात दिवा लावायला हवा. असं मानलं जातं की, यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन आयुष्यात वृध्दी होते.

हेही वाचा: Dhanteras 2022 : आयुर्वेदाचे जनक धन्वंतरीच्या पूजेचे काय आहे वैज्ञानिक कारण? जाणून घ्या

  • या दिवशी व्यापारी लोकांनी कुबेराची आणि वजन काट्याची पूजा करावी आणि देव घरात रात्री अखंड दिवा लावावा.

  • पिंपळाच्या झाडाखाली कणकेचे ११ दिवे करून तेलाच्या वाती लावाव्या व श्रीसूक्त, विष्णू सहस्रनाम म्हणावं.

टॅग्स :Diwali FestivalDiwali