

Diya Lighting Tips and Tricks
sakal
VIRAL DIWALI LIGHTING HACKS ON SOCIAL MEDIA: दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती रंगीबेरंगी रोषणाई, घराबाहेर लटकवलेले सुंदर आकाशकंदील, फराळाच्या पदार्थांचा सुगंध, अंगणात काढलेली आकर्षक रांगोळी आणि फटाक्यांची आतषबाजी! पण या सगळ्या उत्साहात दिवाळीचं खरं सौंदर्य खुलवत असतात त्या मातीच्या पणत्या आणि त्यांचा मंद, प्रसन्न प्रकाश. दिवाळी जवळ आली की आपण घराची स्वच्छता करून सजावटीला सुरुवात करतो. दारात, खिडक्यांमध्ये, बाल्कनीत, तुळशीवृंदावनाजवळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी पणत्यांची सुंदर आरास केली जाते. संध्याकाळ होताच या पणत्या पेटवल्या जातात आणि त्यांच्या प्रकाशाने संपूर्ण घराचा परिसर उजळून निघतो. त्यामुळे दिवाळीच्या सजावटीत पणत्यांना विशेष महत्त्व असतं.