Diwali Festival : मांगल्याचे पुजन, दिव्यांचा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

Diwali Festival : मांगल्याचे पुजन, दिव्यांचा उत्सव

सातारा : शनीवार उद्या २२ धनत्रयोदशी आहे.दिवाळीचा हा दुसरा दिवस धनाची पुजा या दिवशी प्राधान्याने केली जाते. धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू , लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, आणि द्रव्यनिधी आदींचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण आहे.

या दिवशी सायंकाळी घरोघरीं धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. या दिवशी 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणाऱ्या संकटांपासून सूटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची पद्धत आहे. व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते. सायंकाळी (यम दिप दान करणे) कणकीचा ( पिठाचा) दिवा करून दक्षिणेकडे तोंड ( ज्योत) करून ठेवावी.

दिवाळीचा तिसरा दिवस:
रवीवार २३/१०/२०२२.
आज दिवाळीचा कोणताही विधी नाही.

दिवाळीचा चौथा दिवस:
सोमवार (ता. २४) या दिवशी नरकचतुर्दशी - अभ्यंगस्नान आहे. वेळ - चंद्रोदय पहाटे ५.१४ व लक्ष्मीपूजन (अमावस्या) आहे. या दिवशी श्री लक्ष्मी आणि कुबेर पूजन केले जाते. यावेळी पुजनाचा मुहुर्त सायंकाळी सहा ते रात्री ८.३४ आहे.
या दिवशीच नरकचतुर्दशी अभ्यंग स्नान आहे.

५)लक्ष्मीपूजन (अमावस्या)
(मुहूर्त संध्याकाळी ०६.०४ ते रात्रौ.०८.३४)

लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य) मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा.

बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका. नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
हा मंत्रजप ११ वेळा केला तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे.पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा.

काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा.जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा.ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर "#श्रीसुक्त" किंवा "#महालक्ष्मी_अष्टक" यांचेही पाठ करावेत.

(महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्वलित असावेत)

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत.

१) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:
२) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)

३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा
५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:
६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे

अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो .

दिवाळीचा पाचवा दिवस:
मंगळवार २५/१०/२०२२.
खंडग्रास सूर्यग्रहण.
आज दिवाळीचा कोणताही विधी नाही.

दिवाळीचा सहावा दिवस:
बुधवार २६/१०/२०२२.
६)बलीप्रतिपदा
७) दीपावली पाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त) गोवर्धन पूजा (गोठा करणे)
८)भाऊबीज (यमद्वितीया)

Descriptive Diwali Procedure:-
Day 1 -१) शुक्रवार २१/१०/२०२२
अश्विन वद्य एकादशी. (रमा एकादशी)
दिपोत्सवाच्या प्रारंभी येणारी ही एकादशी म्हणजे रमा एकादशी. रमा म्हणजे लक्ष्मी. समुद्र मंथनातून पहिले रत्न निघाले ते म्हणजे लक्ष्मी. म्हणूनच आज कार्तिक स्नानानंतर लक्ष्मीची पूजा करुन उपवास केला जातो. आज विष्णुंना प्रिय अशा तुळशीला प्रदक्षिणा घालतात.या एकादशी पूजनाने सुखाच्या आड येणाऱ्या भावना विनाशासाठी प्रार्थना केली जाते. पापक्षालन करणारी इच्छा पूर्ती करणारी ही रमा एकादशी म्हणजे श्रीविष्णु आणि लक्ष्मीच्या पूजेचे व्रत.

Day 1 - शुक्रवार २१/१०/२०२२
२)वसुबारस (गोवत्सद्वादशी),
समुद्र मंथनातून नंदा नावाची कामधेनू गाय निघाली. यादिवशी वासरू असलेली गाय (सवत्स गाय) यांची पूजा करून नैवेद्य देतात.

Day 2 - शनीवार २२/१०/२०२२.
३)धनत्रयोदशी,
*धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू , लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, आणि द्रव्यनिधी आदींचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी.*
*या दिवशी सायंकाळी घरोघरीं धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो.

या दिवशी 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणाऱ्या संकटांपासून सूटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे. व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे.

Day 3 - रवीवार २३/१०/२०२२
आज दिवाळीचा कोणताही विधी नाही.

Day 4 -सोमवार २४/१०/२०२२.
४) नरकचतुर्दशी (कारीट फोडणे)
अभ्यंग स्नान

५)लक्ष्मीपूजन (अमावस्या)
(मुहूर्त संध्याकाळी ०६.०४ ते रात्रौ.०८.३४)

लक्ष्मी पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य) मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा.

बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही.

त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका. नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥
हा मंत्रजप ११ वेळा केला तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे.पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा.

काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा.

जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा.ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर "#श्रीसुक्त" किंवा "#महालक्ष्मी_अष्टक" यांचेही पाठ करावेत.

(महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्वलित असावेत)

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)