Mangalwar Upay : मंगळवारी करा हे उपाय, तुमच्या आयुष्यातील संकटे झटक्यात होणार दूर

ते उपाय कोणते आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.
Mangalwar Upay
Mangalwar Upaysakal

Mangalwar Upay : माणसाच्या आयुष्यात समस्या असणे, ही साधारण गोष्ट आहे पण अनेकदा उपाय करुनही समस्या अडचणी दूर होत नसेल तर टेन्शन येतं. अशावेळी अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतो. शास्त्र सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पुजा केली तर सर्व संकटे दूर होतात. कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पत असतो.

हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे पुजा करुन काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दुर होतात. ते उपाय कोणते आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

  • असं म्हणतात की हनुमानाला तुळशीची पाने खूप प्रिय आहे त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावी. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर होणार.

  • हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे. हनुमानाला सिंदूर अर्पण करणे, शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होतात.

  • मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा, असे केल्याने सर्व संकटे दूर होतात.

Mangalwar Upay
Hanuman Jayanti: ‘अंजनीपुत्रा तुला रामाचे वरदान'; 51 फुटी हनुमानाच्या दर्शनास धानोऱ्यात भक्तांची दिवसभर गर्दी
  • मंगळवारी हनुमान चालीसाचे पठन केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि दु:ख दुर होतात.

  • ओम क्र क्रा क्रा सह भौमाय नमः मंत्राचा मंगळवारी जप करावा. यामुळे संकटे आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात.

  • मंगळवारी हनुमानाला ११ पिंपळाची पाने अर्पण करावी, यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतात.

  • मंगळवारी मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानासमोर लावावा, तुमच्या सर्व अडचणी दूर होणार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com